शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शासनाअंतर्गत विविध प्रकारच्या अनुदान योजना तसेच केंद्र शासना अंतर्गत राबविण्यात येत असलेली पी एम किसान योजना अशा प्रकारच्या अनेक योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पैशाचे वितरण करण्यात येत असते परंतु शेतकऱ्यांच्या कोणत्या अकाउंट मध्ये हप्त्याचे किंवा अनुदानाचे वितरण होणार हे शेतकऱ्यांना माहीत असायला हवे, कारण मागील काही दिवसांमध्ये पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला होता तसेच पिक विम्याच्या बाबतीत सुद्धा असेच प्रकरण घडले शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली होती, परंतु शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे हे शेतकऱ्यांना कळलेच नाही.
शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यात रक्कम जमा होणार हे अशे चेक करा
सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in ही लिंक ओपन करा. त्यानंतर लॉगिन बटन वर क्लिक करा.
लॉगिन बटन वर क्लिक केल्यानंतर संबंधित ठिकाणी आधार क्रमांक टाका. त्यानंतर जशास तसा कॅपच्या कोड टाका.
त्यानंतर सेंट ओटीपी वर क्लिक करून तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी इंटर ओटीपी मध्ये टाका.
त्यानंतर बँक शेडिंग स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाला कोणती बँक लिंक आहे त्या बँकेचे नाव सुद्धा दिसेल, व शेतकऱ्यांचे पैसे त्याच बँक खात्यामध्ये जमा होतील.
अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे असो अथवा पीएम किसान योजनेतील तसेच नमो शेतकरी योजनेचे असेच कोणत्या योजनेचे अनुदान असो असे पैसे संपूर्ण शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यावर जमा होतील हे वरील दिलेले आहे.