यावर्षी रब्बी हंगामातील पीक विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी लाभ नोंदवलेला आहे. विविध पिकानुसार विविध प्रकारच्या तारखा रब्बी पिक विमा योजनेच्या ठरवण्यात आलेल्या होत्या व त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनेत लाभ नोंदवला आहे कारण राज्यांमध्ये फक्त एक रुपया मध्ये पिक विमा योजना राबवण्यात येत असल्याने जातीत जास्त शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये बोगस पीक विम्याचे प्रकरण पुढे येताना दिसते.
बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरलेला आहे कारण, यावर्षी खरीप हंगामामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बोगस पिक विमा उतरवलेला होता परंतु आत्ताही हे प्रकरण पाहिले असताना कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे मात्र शेतकरी बोगस विमाधारक नाही त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
शेतकऱ्यांनी रब्बी पिक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात 5 लाख 74 हजार 39 हेक्टर पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांनी उतरवलीला आहे परंतु सत्य परिस्थितीचा आढावा घेतला असता, 3 लाख 32 हजार 353 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची पेरणी झालेली आहे त्यामुळे एकंदरीत सांगायचे झाल्यास लागवडीचे क्षेत्र कमी व पिक विमा काढण्याचे क्षेत्र जास्त अशा प्रकारची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेली आहे.
या बीड जिल्ह्यातील बोगस पिक विम्याच्या स्थितीचा आढावा घेऊन शासना अंतर्गत काहीतरी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी खरोखरच रब्बी पिकांची लागवड केलेली आहे अशांना योग्य न्याय मिळेल.