मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत,5 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार, 33 कोटी पेक्षा जास्त अनुदान, लाभ घेण्यासाठी अर्ज करा | Farmer Scheme

राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असतात, शेतकऱ्यांना शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता शासन वारंवार प्रयत्न करते, शासनांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पाडणे हा आहे, अशाच प्रकारची एक योजना राज्य शासना अंतर्गत राबविण्यात येते ती म्हणजेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना होय.

शेतामध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान शेततळे खोदण्यासाठी अनुदान देण्यात येते. अशा परिस्थितीमध्ये आता राज्यातील 5 हजार शेतकऱ्यांसाठी 33 कोटी पेक्षा जास्त अनुदान देण्यात येईल.

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यामध्ये अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे गरजेचे असेल, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना शेतकऱ्यांना सर्वप्रथम शेततळे खोदल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, सातबारा, तसेच जातीचा दाखला याबरोबरच इतर सुद्धा काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

अर्ज सबमिट झाल्यानंतर संबंधित अधिकारी शेत तळ्याची पाहणी करतील व त्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज पुढे ढकलण्यात येईल व तीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वाटप करण्यात येईल. अशाप्रकारे जर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत,5 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार, 33 कोटी पेक्षा जास्त अनुदान, लाभ घेण्यासाठी अर्ज करा | Farmer Scheme

शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करावी,अन्यथा 12% व्याजासह रक्कम द्यावी लागणार

Leave a Comment