शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करावी,अन्यथा 12% व्याजासह रक्कम द्यावी लागणार | Notices to Insurance Companies

राज्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी याकरिता सतत कृषी विभागाअंतर्गत प्रयत्न केले जात आहे व त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे कृषी आयुक्तालयातून पीक विमा कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहे, व त्यानुसार पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमा करावी अन्यथा 2020 च्या पिक विम्याच्या मार्गदर्शक सूचनानुसार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीची सूचना झाल्यानंतर एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणे, विमा कंपनी अंतर्गत एक महिन्याच्या आत रक्कम जमा न केल्यास रकमेवर 12 टक्के एवढे व्याज द्यावे लागेल.

महाराष्ट्रात घडलेली शेती पिका बद्दलची प्रतिकूल परिस्थितीमुळे, अग्रीम पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, 2105.14 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून यापैकी 831 कोटी 49 लाख रुपये एवढी रक्कम पिक विमा कंपनीने वितरित केलेली नाही. त्यामुळे 12 टक्के व्याजासह वीमा कंपनीला रक्कम द्यावी लागेल तसेच विमा कंपनी वर कडक कारवाई सुद्धा करण्यात येईल.

कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्या अंतर्गत पिक विमा कंपन्यांना नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहे त्यामुळे पिक विमा कंपन्यांमध्ये,भारतीय कृषी विमा कंपनी,एचडीएफसी जनरल इन्शुरन्स,आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स,एसबीआय इन्शुरन्स,चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स,ओरिएंटल इन्शुरन्स,युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स या पिक विमा कंपन्यांचा समावेश आहे. अशाप्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना अगदी कमी लवकरात लवकर मिळावे याकरिता सतत प्रयत्न केले जात आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करावी,अन्यथा 12% व्याजासह रक्कम द्यावी लागणार | Notices to Insurance Companies

कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज मोबाईल वरून भरण्याची संपूर्ण प्रोसेस, लगेच अर्ज करा

Leave a Comment