राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती उद्भवल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये शेती पिकाचा आढावा घेऊन शासना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे अपेक्षित आहे, त्यामुळे राज्यामध्ये केंद्राने बारा अधिकाऱ्यांचे पथक पाठवलेले आहे त्या पथका अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकाची पाहणी करण्यात येईल व त्यानुसार झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्याला मदत किती द्यायची हे ठरवण्यात येणार आहे.
राज्य अंतर्गत केंद्राला एक दुष्काळाचा अहवाल सादर करण्यात आलेला होता, त्यामध्ये पंधरा तालुके दुष्काळग्रस्त आहे असे अहवालात होते व त्यातीलच 24 तालुके तीव्र दुष्काळाचे तर माध्यमिक दुष्काळात 16 तालुक्यांचा समावेश केलेला होता. व त्यानुसार केंद्राने पाठवलेली जी पथक असेल ते या जिल्ह्यांमध्ये भेट देतील व त्यानंतर केंद्राला दुष्काळग्रस्त भागातील दुष्काळी स्थितीचा अहवाल पाठवण्यात येईल.
राज्यातील यावर्षीची दुष्काळी परिस्थिती बघता शेती पिकाची झालेले नुकसान याचा आढावा घेऊन अर्थातच पाठवलेल्या अहवालातूनच राज्यांला आर्थिक मदत किती व कशा प्रकारे द्यायची हे केंद्र अंतर्गत ठरवण्यात येणार आहे त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली असतात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य थोड्या प्रमाणात लागू शकणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा करावी,अन्यथा 12% व्याजासह रक्कम द्यावी लागणार