या तारखे पर्यंत हे काम करा, अन्यथा गॅस कनेक्शन होईल बंद, गॅस कनेक्शन ची अंतिम मुदत | Gas Connection Update

गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मागील काही दिवसापासून गॅस ग्राहकांना सांगितले जात आहे की त्यांनी केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, परंतु केवायसी प्रक्रियेला गॅस ग्राहकांकडून मात्र चांगल्या प्रकारे प्रतिसाद येताना दिसत नाही, आणि त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही याचा परिणाम त्यांना सबसिडी बंद होणे हा होऊ शकतो. म्हणजेच ज्या गॅस ग्राहकांनी केवायसी केली नाही अशांना सबसिडी पासून कायमचे वंचित सुद्धा राहावे लागू शकते. 

 

ग्राहकांना केवायसी करण्यासाठी ची तारीख 30 जून देण्यात आलेली आहे या तारखेपर्यंत ज्या ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली अशांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासणार नाही परंतु ज्या ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, अशांचे गॅस कनेक्शन सुद्धा बंद होईल, त्यासोबतच केवायसी न केल्यास त्यांची सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे.

 

उज्वला गॅस योजनेचा लाभार्थ्यांना सिलेंडर वरती सबसिडी दिली जाते, जर उज्वला गॅस योजनेच्या व इतरही ग्राहकांनी जर केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना मिळणारे तीनशे रुपये एवढी सबसिडी बंद होईल, स्थानिक गॅस एजन्सी धारकांच्या माध्यमातून गॅस ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचे आव्हान वारंवार केले जात आहे.

 

गॅस ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे एजन्सी मध्ये जाऊन त्या ठिकाणी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते त्यामध्ये ग्राहकाचे आधार कार्ड, जोडणी ग्राहकाचे पुस्तक, मोबाईल क्रमांक, ग्राहकाचे फेस रीडिंग अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे व या बाबी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहेत.

 

आता या रेशन कार्ड धारकांना सुद्धा मिळणार आयुष्यमान कार्ड, जाणून घ्या कुणाला मिळेल लाभ 

Leave a Comment