राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात तसेच आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहे, व काही भागांमध्ये सोयाबीन मध्ये खुरपणीची तयारी सुद्धा चालू झालेली असून, आता सोयाबीन वर पहिली फवारणी कोणती करावी याचा प्रश्न शेतकऱ्यांना अर्थातच पडलेला आहे, पहिली फवारणी करत असताना उत्पादनात भर पडायचे असेल, तर योग्य फवारणी करणे गरजेचे असते त्यामुळे खालील दिलेल्या माहितीनुसार शेतकरी अत्यंत सुलभरीत्या औषधे निवडून सोयाबीन पिकावर पहिली फवारणी करू शकणार आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोयाबीन पिकावर योग्य वेळेवर फवारणी योग्य प्रकारची व्हावी त्यामधील वेळ महत्त्वाची असून सोयाबीन पिकावर साधारणता 30 ते 35 दिवसांमध्ये फवारणी करणे गरजेचे असते, अशा कालावधीमध्ये मोठ्या संख्येने सोयाबीन पिकावर कीटकांचा प्रादुर्भाव होत असतो, त्यामुळे या प्रादुर्भावाला लगेच टाळणे समाप्त करणे अत्यंत आवश्यक बाब आहे. सोयाबिन वर आलेल्या विविध प्रकारच्या रोगामुळे चक्रीभंगा, खोडमाशी अशा विविध पिकांवरील रोगामुळे कीटकांमुळे सोयाबीनच्या वाढीवर बदल घडून येतो तसेच याचाच परिणाम उत्पादनावर सुद्धा पुढे होऊ शकतो.
सोयाबीन पिकावर फवारणी करत असताना विविध प्रकारच्या औषधांचा समावेश केला जातो, प्रोफेनोफोस 50 इ.सी ( प्रोफेण, प्रोफोस) 20 मिलि/10 लिटर पाणी या औषधाची फवारणी शेतकरी करू शकतात या व्यतिरिक्त हे औषध किंवा प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC (प्रोफेक्स सुपर, पॉलीट्रिन-सी) 20 मिलि/10 लिटर पाणी हे औषध वापरावे. अथवा थायामेथोक्सम १२.६% लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी (अलिका) 2.5 मिलि/10 लिटर पाणी या पण औषधाचा वापर शेतकरी सोयाबीनमध्ये पहिली फवारणी करत असताना वापरू शकतात.
कापसावर येतोय लाल्या रोग, शेतकऱ्यांनो लगेच नियंत्रण करा अथवा, उत्पादनात होणार मोठी घट