शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात एवढ्या रुपयांची घसरण | Soybean Rate

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढतील या उद्देशाने सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये मात्र शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे, बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढलेली असताना सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याचे दिसते. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे साठवणूक केलेली आहे असे शेतकरी आता बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे त्यामुळे आवक वाढल्याने सोयाबीनच्या दरात थोड्या प्रमाणात घसरण झालेली आहे.

30 नोव्हेंबर या दिवशी अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला दर जास्तीत जास्त 5155 रुपये ते कमाल दर 4000 रुपये एवढा होता. तर अकोला बाजार समितीत असलेला सरासरी सोयाबीनला दर 5 हजार रुपये एवढा होता. या दराच्या तुलनेत मात्र सहा डिसेंबर 2023 रोजी चा सोयाबीनला मिळालेला दर हा कमी आहे. अकोला बाजार समितीमध्ये मिळालेला सोयाबीनचा दर हा जास्तीत जास्त 4780 रुपये एवढा होता, तर सरासरी दर चार हजार चारशे रुपये एवढा पाहायला मिळाला. एकंदरीत सांगायची झाल्यास 30 नोव्हेंबर या दिवशीचा सोयाबीनचा दर व 6 डिसेंबर या दिवशी सोयाबीन दरात घसरण झालेली दिसते.

सोयाबीन दरात घसरण का झाली?

सोयाबीन दरात घसरण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणुक केलेली असता बाजारामध्ये आवक वाढत आहे, 01 डिसेंबर अकोला बाजार समितीत आवक सोयाबीनची कमी असल्याने दर जास्त होता व सहा नोव्हेंबरला अकोला बाजार समितीतील सोयाबीनची आवक वाढलेली दिसली, 4233 क्विंटल एवढी आवक अकोला बाजार समितीत झाली.

त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत झालेला आहे सोयाबीनचे दर वाढतील या उद्देशाने साठवून ठेवलेले सोयाबीन आता कमी दराने विकण्याची वेळ सुद्धा शेतकऱ्यांवर येऊन पोहोचत आहे, सोयाबीन दरात घसरण झालेली असताना शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक वातावरण पसरलेले आहे

 

मराठा समाजाच्या नागरिकांना मिळणार व्यवसाय चालू करण्यासाठी 50 लाखापर्यंतचे कर्ज

Leave a Comment