सोयाबीन पिकावर याच औषधाची पहिली फवारणी करा, शेतकऱ्यांना मिळणार उत्तम रिझल्ट | Soybean Spray

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा असतो, व राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भागामध्ये सोयाबीनची लागवड केलेली आहे, त्यामुळे अशा स्थितीत सोयाबीन पिकावर कोणत्या औषधांची फवारणी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असेल. कारण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी कोणत्या औषधाची करते यावर सुद्धा उत्पादनात भर पाढता येणार आहे, त्यामुळे उत्तम प्रकारची औषध फवारणी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, सोयाबीन ची लागवड झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसा दरम्यान शेतकऱ्यांनी फवारणी पहिली करणे गरजेचे आहे. 

 

राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली असली तरीसुद्धा राज्यातील काही भाग पाण्यापासून वंचित राहिलेला आहे, त्यामुळे अनेक भागात पेरणीला सुरुवात झालेली नसून पावसाची प्रतिक्षा शेतकरी करत आहे, त्यामुळे तुमच्या भागात जर पाऊस पडलेला असेल, तर सोयाबीन पिकाची तुम्ही पेरणी केलेली असेल तर तुम्ही पहिली फवारणी योग्य औषधांची व योग्य कीटकनाशकांची करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

सोयाबीन पिकाला पहिली फवारणी करत असताना सोयाबीन पिकाला एक त्यामध्ये सोयाबीन पिकाचा चांगले वाढावे पिकांची ग्रोथ याकरिता औषध देणे गरजेचे असते, प्रति पंप 40 मिलीने बायोवीटा-एक्स या औषधाची फवारणी सोयाबीन पिकावर करावी. फवारणी करत असताना त्यावर निदान चार ते पाच तास पाणी येऊ नये, व ढगाळ वातावरण असेल व पाणी चालू झाले असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी करणे थांबवावे.

 

सोयाबीन पिकावर सुरुवातीला अनेक प्रकारच्या कीटकांचा समावेश असतो, त्यामध्ये खोडकिड, अळी यांपासून पिकांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याने फवारणी करताना या कीटकांचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांनी अलीका अशा नावाचे कीटकनाशक वापरावे, तसेच प्रोपेक्स सुपरचा सुद्धा वापर शेतकरी करू शकतात, अशा प्रकारे सोयाबीन पिकावर वरील दिलेल्या प्रमाणे शेतकऱ्यांनी फवारणी करणे गरजेचे आहे, व ही फवारणी 15 ते 20 दिवसांमध्ये म्हणजेच सोयाबीन पीक 15 ते 20 दिवसांचे झाल्यावर करणे आवश्यक असते.

टीप: ही केवळ माहिती आहे, शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी स्वतः तज्ञांना विचारून खात्री करून नंतर कोणत्याही औषधाची फवारणी करावी.

या महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात सुरू, शासन निर्णय आला! 

Leave a Comment