राज्यात सुरू होणार लाडकी बहिण योजना, या महिलांना मिळणार 1500 रुपये दर महा! | Ladaki Bahin Yoajan Maharashtra

येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीला सुरुवात होईल व विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबवली जाऊ शकते, व राज्य शासनाची तयारी सुद्धा या योजनेबाबतची झालेली असून, येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी योजनेची सुरुवात करण्याची तयारी सुद्धा शासनाच्या माध्यमातून केली जात आहे, कारण आपल्या शेजारी असलेले राज्य मध्यप्रदेश या मध्य प्रदेश मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून लाडली बहना योजना चालू करण्यात आलेली होती, व याचाच फायदा म्हणून त्यांना निवडणुकीमध्ये चांगल्या प्रमाणात यश येताना दिसते व हेच यश बघून महाराष्ट्र राज्य शासन सुद्धा महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना आणणार आहे.

 

राज्यामध्ये लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर राज्यातील महिलांना दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये एवढे मानधन देण्याची योजना चालू करण्यात याचा विचार शासनाच्या माध्यमातून केला जात आहे, तसेच येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या बाबत काही घोषणा सुद्धा केल्या जाऊ शकतात, व राज्यांमध्ये लवकरच ही योजना चालू करण्याचा मानस सुद्धा शासनाचा आहे.

 

राज्यामध्ये येणारा काळा विधानसभा निवडणुकीचा असणार आहे त्यामुळे महिला वर्गांना एक प्रकारचे गिफ्ट किंवा एक प्रकारची मदत देणे हा शासनाचा उद्देश असून त्यांना खुश करणे हा उद्देश मुख्य ठेवण्यात आलेला आहे, त्याचाच फायदा शासनाला सुद्धा होऊ शकतो. अशाप्रकारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मध्य प्रदेश मध्ये राबवली जात असलेली लाडली बहना योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना राबवली जाऊ शकते, व याचा लाभ देशातील मोठ्या संख्येने महिलांना मिळणार आहे.

 

आता या रेशन कार्ड धारकांना सुद्धा मिळणार आयुष्यमान कार्ड, जाणून घ्या कुणाला मिळेल लाभ 

Leave a Comment