महिलांनो महिन्याला 1500 रुपये मिळविण्यासाठी हा फॉर्म भरा, लाडकी बहिण योजना अर्ज | Ladaki Bahin Yojana

28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास मंजुरी दिली असून, यासंबंधीचा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जाणार आहे, या संबंधित अर्ज प्रक्रिया महिलांना त्वरित पूर्ण करावी लागणार आहे, कारण 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून यानंतर महिलांच्या पात्रतेची यादी काढली जाईल, म्हणजेच महिलांना 15 जुलै पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिला अर्ज करू शकणार आहेत तसेच महिलांचे वय 21 ते 60 वर्षा दरम्यानचे असणे गरजेचे असून, महिला विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्त्या, निराधार अशा महिलांना योजनेच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेता येणार आहे, तसेच अर्ज करणाऱ्या महिलेकडे बँकेचे खाते पुस्तक उपलब्ध असणे गरजेचे आहे.

 

यामध्ये काही अपात्रतेच्या सुद्धा अटी देण्यात आलेल्या आहेत जर महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर योजनेस पात्र ठरणार नाही, तसेच चार चाकी गाडी असेल तर, व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर या संपूर्ण अटीमध्ये महिला अपात्र ठरेल, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती खासदार, आमदार असतील अशा महिला अपात्र, तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल अशा महिला योजनेस पात्र ठरणार नाही.

 

अर्ज कसा व कुठे करावा? 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज करत असताना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पूर्ण केली जाऊ शकते, मोबाईल द्वारा किंवा ऑनलाइन पोर्टल वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहेयाबरोबरच ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न करू इच्छिणाऱ्या महिलांना अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा ग्रामपंचायत केंद्रामध्ये जाऊन सुद्धा अर्जासाठीची सुविधा केंद्र उपलब्ध असतील, अर्ज केल्यानंतर त्याची प्रोसेस पुढे पाठवली जाईल त्या माहितीची छाननी करून पात्र महिलेची निवड केली जाईल व त्यानंतर एक ऑगस्ट रोजी पात्र महिलांची अंतिमयादि काढली जाईल.

 

अर्ज करत असताना महिलेकडे काही आवश्यक कागदपत्रे असावी त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते पुस्तक अशा प्रकारची काही आवश्यक कागदपत्रे महिलेला अर्ज करत असताना गरजेचे असेल, अशाप्रकारे वरील दिलेल्या माहितीनुसार महिला अर्ज करू शकणार आहेत.

 

LPG गॅस सिलेंडरच्या किमती एवढ्या रुपयांनी कमी झाल्या, आता मिळणार एवढ्या रुपयात सिलेंडर 

Leave a Comment