मान्सून सक्रिय होण्याचे वातावरण निर्माण होऊन राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता, या भागात ऑरेंज अलर्ट | Pavsachi Shakyata 

मागील काही दिवसांमध्ये पावसाचा खंड पडलेला होता, त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लागलेली होती, व बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे वातावरण निर्माण होऊन पावसाला पोशक हवामान निर्माण झालेली आहे,व याच कारणाने राज्यातील विविध भागांमध्ये कालपासून पावसाने सुरुवात केलेली आहे, काल राज्यातील अनेक भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला असून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवली गेली आहे. 

 

हवामान विभागाने कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, यासह कोकण व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे, रायगड रत्नागिरी व पुण्यामध्ये पावसाची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे, मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवसात मध्यम स्वरूपाच्या पाऊस होऊ शकतो असा अंदाज असून काही भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा होऊ शकणार आहे.

 

विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कड कडाटासह पावसाची शक्यता आहे, त्यासह पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असल्याने राज्यात पाऊस येणार आहे व काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे अशाप्रकारे शेतकऱ्यांना व शेती पिकांना एक प्रकारचा दिलासा या पावसाने मिळू शकतो.

 

देशातील पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बीहार, उत्तराखंड, राजस्थान व उत्तर प्रदेश यासह इतरही भाग मान्सूनचा छायेमध्ये आलेले असल्याची माहिती देण्यात आली, हे सर्व बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असल्याने निर्माण झालेले आहे. अशाप्रकारे हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे.

 

कापसाला खताचा पहिला डोस कधी द्यायचा? कापूस खत व्यवस्थापन असे करा 

Leave a Comment