शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचे आवाहन, पिक विमा भरताना 1 रुपयाच्या वर जास्त पैसे देऊ नये | Pik Vima

राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा योजना चालू करण्यात आलेली असल्याने पिक विमा भरत असताना अतिरिक्त रक्कम न भरता शेतकऱ्यांना अगदी एक रुपये भरूनच पिक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे. परंतु कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे की, शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना एक रुपया व्यतिरिक्त जास्त रक्कम सीएससी सेंटर धारकाला म्हणजेच पिक विमा भरणाऱ्या व्यक्तीला देऊ नये. 

 

मुख्य कारण म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे नागरिक पीक विमा भरत आहेत म्हणजेच सीएससी सेंटरधारकांना पिक विमा भरणाऱ्यांना प्रति अर्ज 40 रुपये प्रमाणे रुपये दिले जात आहे त्यामुळे सीएससी सेंटर धारकाला शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया द्यावा व पिक विमा भरावा परंतु यानंतरही शेतकऱ्यांना सीएससी सेंटर धारका कडून जास्त पैशाची मागणी झाली असेल, तर शेतकऱ्यांना अगदी सहजरीत्या तक्रार सुद्धा नोंदवता येणार आहे, परंतु काहीही झाले तरी शेतकऱ्यांनी एक रुपया व्यतिरिक्त जास्तीची रक्कम सीएससी सेंटरधारकाला शेतकऱ्यांनी देऊ नये,असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे.

 

सीएससी सेंटर धारकाने जर एक रूपया व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी केली तर जवळील स्थानिक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तसेच ग्रामविकास विभागाच्या मदतीत कडक कारवाई केली जाईल, त्यासह

9822446655 या व्हाट्सअप क्रमांकावर शेतकऱ्यांना थेट तक्रार सुद्धा करता येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध होऊन पिक विमा भरताना सावधगिरी बाळगून एक रुपया देऊन पिक विमा भरून घ्यावा. पिक विमा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेत आहेत, आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून रोज पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

 

या महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात सुरू, शासन निर्णय आला!

Leave a Comment