मुला मुलींना मिळणार अनुदानावर सायकल वाटप, अर्ज प्रक्रिया सुरू लगेच या ठिकाणी अर्ज करा | Saykal Anudan 

विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना एक प्रकारे सहाय्य व्हावे याकरिता शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, व त्यातीलच एक योजना जिल्हा परिषद सेस योजना म्हणून ओळखली जाते, या योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीय कल्याण निधीच्या माध्यमातून मुला मुलींना म्हणजेच पाचवी ते नवव्या वर्गामध्ये असणाऱ्या मुला मुलींना सायकल अनुदानासाठी पाच हजार रुपयापर्यंतची रक्कम दिली जाते. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेस योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात व आता हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमातून अर्ज मागविले जात आहे. 

 

पाचवी ते नववी या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना योजनेअंतर्गत लाभ घेता येईल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी त्यांच्या घरापासून ते शाळेपर्यंतचे अंतर हे दोन किलोमीटर एवढे असणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करावी लागेल, सायकलची जी किंमत होईल ती किंमत दिली जाईल किंवा जास्तीत जास्त पाच हजार रुपये पर्यंतचे सायकल साठीचे अनुदान दिले जाईल.

 

त्यामध्ये मुख्य म्हणजे सायकल योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर विद्यार्थ्याला सर्वप्रथम सायकल खरेदी करावे लागणार आहे, सायकलच्या अनुदानासाठी चे मूळ देय तसेच सायकल खरेदी केल्याबाबतचे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र सुद्धा लागेल, हा प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी अथवा गट विकास अधिकारी यांच्याकडून जमा करावा लागेल, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल.

 

हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सायकल अनुदान वाटपाचा लाभ घ्यायचा असल्यास 19 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, सायकल अनुदाना साठी जास्तीत जास्त विद्यार्थांनी अर्ज करावेत अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे.

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना या चुका करू नका अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही 

Leave a Comment