20 शेळ्या आणि 2 बोकड वाटप योजनेला मंजुरी, जाणून घ्या काय आहे योजना | Sheli Gat Vatap Yojana

राज्यातील जालना जिल्ह्यामध्ये शेळी गट वाटपाच्या पथदर्शी योजनेस मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास लक्षांका नुसार योजनेच्या माध्यमातून एक हजार लाभार्थ्यांना 20 शेळ्या आणि दोन बोकड वाटप योजनेच्या माध्यमातून द्यावयाचा आहे तसेच, 2017 चे जे शुद्धिपत्रक आहे त्यानुसार सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना बँक इंडेड अनुदान 50% एवढे देणे देय असणार आहे. 

 

उर्वरित असलेले 25% अनुदान हे गट स्थापनेच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दिले जाईल, तर पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये 25 टक्के एवढे अनुदान दिले जाईल, व अनुदान हे थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अशा प्रकारे आता जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांना वीस शेळ्या आणि दोन बोकड वाटप केले जाईल व योजनेच्या माध्यमातून 1000 लाभार्थ्यांना लाभ दिला जाण्याचे जे उद्दिष्टे होते ते सुद्धा पूर्ण केले जाईल.

 

449 लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाभ दिला गेलेला आहे उर्वरित 551 लाभार्थ्यांना योजनेचा माध्यमातून लाभ दिला जाईल, व मराठवाडा पॅकेज नुसार आता जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांना वीस शेळ्या व दोन बोकड असा गट वाटप म्हणजेच शेळी गट बँक इंडेड अनुदान तत्वावर प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

 

अशाप्रकारे जालना जिल्ह्यामध्ये लवकरच एक हजार लाभार्थ्यांना पथदर्शी योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे यासंबंधीचा शासन निर्णय झालेला असून काही लाभार्थी योजनेस पात्र झालेले असून लाभ दिला गेलेला आहे व उर्वरित असलेली लाभार्थी योजनेच्या माध्यमातून पात्र ठरून लाभ दिला जाईल. व पथदर्शी योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

 

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणार प्रती हेक्टर प्रमाणे आर्थिक मदत, अजित पवारांची घोषणा 

Leave a Comment