राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे व त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना आता महावितरण अंतर्गत सोलर पंप चा लाभ घेता येणार आहे. राज्यामध्ये कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महावितरण अंतर्गत सुद्धा आता सोलार पंप शेतकऱ्यांना देण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल व त्यानंतर सोलार पंपचा लाभ देण्यात येणार आहे.
महावितरण अंतर्गत चालू करण्यात आलेल्या सोलार पंप योजने अंतर्गत नवीन पोर्टल चालू करण्यात आलेले असून त्यावरून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुद्धा चालू केलेली आहे त्यामुळे जे शेतकरी सोलार पंप अंतर्गत इच्छुक असतील अशांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. परंतु यामध्ये सुद्धा काही पात्रता ठरवण्यात आलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी विज जोडणीसाठी पैसे भरुन, वीज जोडणीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे अशांना यामध्ये अर्ज करता येईल. कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना महाडीबिटी अंतर्गत सोलार पंप योजना साठी अर्ज करता येणार नाही.
अर्ज प्रक्रिया
- शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही पैसे देऊन प्रलंबित आहात का हे ऑप्शन ओपन होईल त्यामध्ये एस ऑप्शन निवडून त्यानंतर खालील दिलेल्या बॉक्समध्ये ग्राहक क्रमांक प्रविष्ट करावा लागेल ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर संपूर्ण माहिती ओपन होईल.
- शेतकऱ्या बद्दलची संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये विचारण्यात येईल ती संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भरावी लागेल. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईल क्रमांक आवर युजर आयडी पासवर्ड पाठवल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन करावे लागेल. त्यासाठी लिंक वर क्लिक करा.
- तुम्हाला एप्लीकेशन नंबर विचारण्यात येईल एप्लीकेशन नंबर टाका पासवर्ड टाकून लॉगिन बटन वर क्लिक करा.
- त्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये विचारण्यात येईल पुन्हा एकदा संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून आवश्यक कागदपत्रे योग्य साईनुसार शेतकऱ्यांना अपलोड करावी लागेल संपूर्ण कागदपत्रे अपलोड केलेल्या नंतर अर्ज सबमिट करावा. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरला बोगस रब्बी पिक विमा, आता सरकारची प्रतिक्रिया काय असेल?