राज्यातील या भागात जोरदार पावसाची शक्यता तर या भागात वर्तवला येलो अलर्ट, IMD अंदाज | Weather Forecast

हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येत्या काही तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, तर काही भागांमध्ये आतापर्यंत पाऊस आलेला नाही अशा स्थितीत शेतकरी चिंतेत झालेले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता तर काही भागात येलो अलर्ट जरी केलेला आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला असून राज्यातील विविध भागांमध्ये जोर वाढताना दिसतो आहे. 

 

तसेच हवामान वीभागाच्या माध्यमातून मान्सून दाखल झालेला आहे, असे सांगण्यात आलेले होते, परंतु मान्सूनचा प्रवास थांबलेला असताना शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे, त्यामुळे काही भागांमध्ये जो पाऊस पडताना दिसतो, त्या भागात चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे, परंतु अजूनही काही भाग पावसापासून वंचित राहिलेले असल्याने पेरण्या सुद्धा खोळंबून बसलेल्या आहे.

 

हवामान विभागाच्या माध्यमातून दक्षिण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे, तर मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, घाटमाथा व उर्वरित कोकणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असून विदर्भ व मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो, राज्यातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा व पुणे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे.

 

राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त केलेली असून त्यामध्ये जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर,भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केलेला आहे, अशाप्रकारे राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आय एम डी ने व्यक्त केलेली आहे.

 

महाडीबीटीच्या योजनांची लॉटरी लागली, तुम्हाला मेसेज आला का? 7 दिवसात कागदपत्रे अपलोड करावी लागणार 

Leave a Comment