अनेक उमेदवार नोकरीसाठी इच्छुक असतात त्यामुळे अशा उमेदवारांना एक अत्यंत चांगली नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते, कारण जिल्हा न्यायालय भरती केली जाणार आहे, व त्यामध्ये 5793 जागांची ही भरती असणार आहे, भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
जिल्हा न्यायालय भरती 2023
एकूण पदसंख्या – 5793 जागा
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन पद्धतीने
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे तसेच ही भरती संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अटी व शर्ती उमेदवारांनी जाणून घ्याव्यात, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादेची अट पदांचा असलेले वेतन या संपूर्ण बाबी उमेदवारांनी जाणून घ्यायला हव्यात.
- तसेच संबंधित पदभरतीची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व ती जाहिरात शेवटी देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या जाहिरातीचा सुद्धा एकदा आढावा उमेदवारांनी घ्यावा.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड योग्य साईज नुसार करावे.
- अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती उमेदवारांनी भरूनही योग्य व खरी असलेली माहिती अर्ज भरताना भरावी.
- अर्ज भरल्यानंतर अर्ज फी सुद्धा ऑनलाइन पद्धतीने अदा करावी.
- अर्ज भरताना एक महत्त्वाची बाब म्हणजे अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जाणून घ्यायला हवी त्या संबंधित शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
पदाचे नाव, पदसंख्या व पदांनुसार वेतन
क्र | पदाचे नाव | पदसंख्या | वेतन (रू) |
1 | लघुलेखक (श्रेणी 3) | 714 | 38,600 ते 1,22,800 |
2 | कनिष्ठ लिपिक | 3495 | 19,900 ते 63, 200 |
3 | शिपाई/हमाल | 1584 | 15,000 ते 47,600 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता
- लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी कोणत्याही शाखेतील एक पदवी असावी. तसेच इतर सुद्धा अटी आहे त्यासाठी जाहिरात बघावी.
- कनिष्ठ लिपिक या पदासाठी सुद्धा कोणत्याही शाखेतील एक पदवी असणे गरजेचे आहे.तसेच इतर सुद्धा अटी आहे त्यासाठी जाहिरात बघावी.
- शिपाई या पदासाठी शरीरयष्टी चांगली असावी तसेच उमेदवार हा कमीत कमी सातवी पास असणे गरजेचे आहे.